महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान, डॉईश बँक यांच्या दरम्यान सामंजस्य करार बुधवार, ०३ जानेवारी, २०१८
बातमी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान आणि डॉईश बँक यांच्या दरम्यान सामंजस्य करारावर आज स्वाक्षरी करण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी कार्यक्रम झाला. याप्रसंगी डॉईश बँकेने महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा क्षेत्राशी निगडित प्रकल्पांबाबत तयार केलेला अहवालही मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला.

डॉईश बँक व ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (व्हिलेज सोशल ट्रान्सफॉरमेशन फांऊडेशन - व्हिएसटिएफ) यंत्रणा यांच्या दरम्यान झालेल्या या करारात सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे प्रकल्प अंतर्भूत आहेत. या करारावर डॉईश बँकेच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रवनीत गिल तर ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रमण्यम यांनी स्वाक्षरी केल्या. श्री.गिल यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला.

तत्पूर्वी, चर्चेत श्री.गिल यांनी अहवालातील महत्त्वपूर्ण निष्कर्षांची मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. महाराष्ट्रातील प्रकल्पाची अंमलबजावणी कार्यक्षम आणि उत्कृष्टरित्या सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी यांच्यासह अभियान यंत्रणा तसेच डॉईश बँकेचे अधिकारी आदी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा