महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
२८६ आमदारांचा शपथविधी बुधवार, २७ नोव्हेंबर, २०१९
बातमी

मुंबई : विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी 14 व्या विधानसभेमध्ये निवडून आलेल्या 288 पैकी उपस्थित 285 सदस्यांना (दु. 1 वा.पर्यंत) सदस्यत्वाची शपथ दिली. श्री.कोळंबकर यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ दिली आहे. सुधीर मुनगंटीवार आणि देवेंद्र भुयार हे अनुपस्थित असल्याने त्यांचा शपथविधी आज होऊ शकला नाही.

14 व्या विधानसभेमध्ये निवडून आलेल्या सदस्यांना शपथ देण्यासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज विधानसभेची बैठक अभिनिमंत्रित केली होती. बैठकीचा प्रारंभ वंदे मातरम् ने तर राष्ट्रगीताने समारोप झाला.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा