महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
बळीराजाला सुखी करावे, दुष्काळी भागात पाऊस पडावा - मुख्यमंत्र्यांची गणरायाकडे प्रार्थना गुरुवार, १३ सप्टेंबर, २०१८
बातमी

 वर्षा निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना                   

मुंबई, दि. 13 : बळीराजा सुखी व्हावा, राज्यातील दुष्काळी भागात पाऊस पडावा आणि नागरिकांना सुखसमाधान, चांगले आरोग्य मिळावे, अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गणरायाकडे केली. वर्षा या शासकीय निवासस्थानी आज त्यांनी सपत्नीक श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली.


लोकमान्य टिळकांनी जात, धर्म, भाषा, पंथ यापलीकडे जाऊन लोकांनी संघटित व्हावे या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. सामाजिक अभिसरणासाठी त्यांनी सुरु केलेले पर्व अव्याहत सुरु आहे. या उत्सवातून समाज अधिक एकसंघ होऊ दे, अशी प्रार्थना करून मुख्यमंत्र्यांनी जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पदूम मंत्री महादेव जानकर, कामगार मंत्री संभाजी पाटील - निलंगेकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, विद्या ठाकूर, आमदार विनायक मेटे, तारासिंग, भारती लव्हेकर, राज पुरोहीत, आशिष शेलार आदींनी वर्षा निवासस्थानी भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा