महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट बुधवार, ०९ ऑगस्ट, २०१७
बातमी
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेऊन मराठा समाजाच्या विविध मागण्या मांडल्या.

या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले, तसेच या मागण्यांची पूर्तता करण्यासंदर्भात चर्चेसाठी शासन नेहमीच पुढाकार घेईल असेही ते म्हणाले.

या शिष्टमंडळात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम ) मंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, सहकार मंत्री सुभाष देशमुख, कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत, राज्यमंत्री दीपक केसरकर,विजय शिवतारे, अर्जुन खोतकर, खासदार संभाजीराजे भोसले, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार नारायण राणे, विनायक मेटे, अजित पवार, जयंत पाटील, सुनील तटकरे, राम कदम, प्रवीण दरेकर, शशिकांत शिंदे आदी विधानपरिषद व विधानसभेचे सदस्य, शिष्टमंडळातील नेते शशिकांत पवार यांच्यासह शिष्टमंडळातील अन्य कार्यकर्ते, निवेदन देण्यासाठी आलेल्या युवती, महिला उपस्थित होत्या.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा