महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
आपलं गिरगाव दिनदर्शिका २०२० चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन शनिवार, ११ जानेवारी, २०२०
बातमी
 
मुंबई, दि 10  आपलं गिरगाव दिनदर्शिका 2020 चे प्रकाशन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी मातोश्री येथे करण्यात आले.

यावेळी खासदार अनिल देसाई, रवींद्र मिरलेकर, श्रीमती मीनाताई कांबळी, विभागप्रमुख पांडुरंग सपकाळ, ज्येष्ठ चित्रपट समीक्षक अरुण पुराणिक, दिलीप ठाकूर, अशोक मुळे, प्रथमेश सपकाळ बाळ अहिर आदी उपस्थित होते.

दिनदर्शिकेच्या मुखपृष्ठवर मूळ गिरगावकर असलेले मुंबईचे शिल्पकार नाना उर्फ जगन्नाथ शंकर शेट यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले आहे. या दिनदर्शिकेमध्ये मूळ गिरगावकरांची ओळख, लेख आणि छायाचित्राच्या माध्यमातून जपण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यात साहित्य, कला, सणसंस्कृती, शिक्षण, धार्मिक, पर्यटन यासह 12 विषयाचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.

 
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा