महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
बिडकीन येथे ५०० एकर जमीनीवर अन्न प्रक्रिया केंद्र उभारणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवार, ०९ जानेवारी, २०२०
बातमी
औरंगाबाद येथील 'ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोया औद्योगिक प्रदर्शनाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

औरंगाबाद : राज्याच्या औद्योगिक विकासाद्वारे उद्योजक आणि शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्यास शासनाचे प्राधान्य आहेत्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद बिडकीन येथे पाचशे एकर जमीनीवर 'अन्न प्रक्रिया केंद्रउभारणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.

औरंगाबाद कलाग्रामगरवारे संकुल परिसर येथे मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर (मसिआयांच्याद्वारे आयोजित चार दिवसीय 'ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोया औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालेत्यावेळी ते बोलत होतेयावेळी व्यासपीठावर उद्योग मंत्री तथा औरंगाबाद जिल्हा पालकमंत्री सुभाष देसाईसार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपेपर्यटनपर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरेरोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरेमहसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तारपाणी पुरवठा व स्वच्छतासंसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडेखासदार इम्तियाज जलीलखासदार राजकुमार धुतआमदार सर्वश्री हरीभाऊ बागडेअतुल सावेप्रदीप जैस्वालप्रशांत बंबअंबादास दानवेसंजय सिरसाटसतिश चव्हाणविक्रम काळेउदयसिंह राजपुतप्रारमेश बोरनारेमहापौर नंदकुमार घोडेलेउपमहापौर राजेंद्र जंजाळमुख्य सचिव अजोय मेहतामुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव भुषण गगराणीविकास आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळेविभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरजिल्हाधिकारी उदय चौधरीमहानगर पालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौरयांच्यासह इतर मान्यवरपदाधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेशेतकरी आणि उद्योजक यांच्या कष्टालादुर्दम्य इच्छाशक्तीला शासनाच्या कृतीशील प्रयत्नाची भक्कम साथ देण्याचा शासनाचा मानस आहेशेतकऱ्याला कर्जमुक्त करत असतानाच आता शेतकरी हा चिंतामुक्त करण्याची शासनाची भूमिका आहेउद्योग विकासाद्वारे येथील शेतकरीभूमीपुत्रांना रोजगार संधी देण्यासउद्योजकांना सक्षम करण्यास शासनाचे प्रथम प्राधान्य आहेउद्योग आणि कृषी या दोन विभागांच्या समन्वयातून अन्न प्रक्रियातेलबिया प्रक्रिया यासारख्या शेतमालाशी  निगडीत अन्नधान्य प्रक्रिया उद्योगांना मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येणार आहेबिडकीन येथील पाचशे एकर जमिनीवरील अन्न प्रक्रिया केंद्राचे लवकरच भूमीपूजन करून गतीने केंद्र उभारणीचे काम पूर्ण केले जाईलतसेच या ठिकाणी 100 एकर जमीन ही महिला उद्योजकांसाठी राखीव असणार आहेमराठवाड्यात उद्योगक्षेत्रात भरीव प्रमाणात काम होत असून उद्योग विकासासाठी सर्व प्रकारचे सहकार्य शासन स्तरावरून उपलब्ध करून दिले जाईलअसे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

त्या सोबतच राज्यात नवनवीन उद्योग समूहव्यवसाय संधी विस्तारणार आहेत्यासाठीचे तयार मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच शेंद्रा येथे कौशल्य विकास संकुलदेखील उभारणार आहेअसे मुख्यमंत्री म्हणालेतसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची क्षमता महाराष्ट्रातील मराठवाड्यातील औद्योगिक क्षेत्रात आहेपारंपारिक उद्योग व्यवसायाच्या पुढे जात वेगळा आधुनिक प्रयोग करून जगाला मेड इन इंडियाची ओळख आपण करून देऊ शकतो हा विश्वास देणारे काम मराठवाड्यात होत आहेमराठवाड्याची ही औद्योगिक ताकत दाखवणारे हे प्रदर्शन आहेअशा शब्दांत प्रदर्शनाचे कौतुक करून मुख्यमंत्री पुढे म्हणालेआपल्या सगळ्यांना दोन घास देणाऱ्या शेतकऱ्याला हवामानाच्या  लहरीपणामुळे खूप समस्यांनाअस्थिरतेला सामोरे जावे लागत आहेत्याला आधार देण्यासाठीभूमिपुत्रांना रोजगार देण्यासाठी शासन उद्योग विकासाला भरीव चालना देणार आहेत्यातुन भूमीपुत्रांना रोजगार देणे आणि उद्योग क्षेत्राचा झपाट्याने विकास करणे शक्य होईलयाद्वारे राज्य गतिमानतेने प्रगती करेलअसेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणालेकृषीजलउद्योग क्षेत्राच्या समस्या दूर करून राज्याला गतीने पुढे नेण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्धार आहेमराठवाड्याचेराज्याचे औद्योगिक क्षेत्र मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वातून अधिक समृद्ध होईलत्यादृष्टीने मराठवाड्याच्या व्यापक प्रगतीसाठी येथे औद्योगिक विकासाला प्राधान्य देण्यात येत असून लवकरच औरंगाबाद येथे अतिरीक्त शेंद्रा औद्योगिक वसाहत 1 हजार हेक्टर क्षेत्रावर सुरू करणार आहोतजालना उस्मानाबादनांदेड येथील उद्योग विस्तारासाठीच्या पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या कामालाही अधिक गतिमान करण्यात येणार आहेकापसावर आधारीत उद्योग व्यवसाय विस्तारण्यासाठी कापसाची दरवाढ करणार असून उस्मानाबाद येथे टेक्नीकल हब सुरू करणार आहेमराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नवीन उद्योग येणार आहेत्या माध्यमातून ८ हजार 360 कोटी रूपयांची नवीन गुंतवणूक येणार आहेतसेच उद्योजकांना सेवा शुल्काचा भार वाटणार नाही या पद्धतीने तो कमी केला आहेअसे सांगून श्री.देसाई म्हणाले या प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मसिआचे विशेष अभिनंदन केले पाहिजेऑटो क्लस्टररबर क्लस्टरक्लस्टर डेव्हलपमेंट यासारख्या विविध उपयुक्त उपक्रमातून मसिआ उद्योजकांच्या विकासाला पूरक ठरणारे काम मोठ्या प्रमाणात करत आहेअसे श्री.देसाई म्हणाले.

मसिआचे अध्यक्ष ज्ञानदेव राजाळे यांनी संघटनेबद्दलची माहिती व उद्योजकांच्या अपेक्षा मनोगतामध्ये व्यक्त केल्याकार्यक्रमास मोठ्या संख्येने मान्यवर उद्योजकलघुउद्योजकसंबंधित अधिकारीपदाधिकारी उपस्थित होते.
      
या प्रदर्शनात साडेचारशेवर उद्योजकांनी उत्पादने मांडली आहेतऔरंगाबादमराठवाड्यासह राज्य आणि देशभरातून सहभागी होणाऱ्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीइंजिनिअरिंगॲग्रीकल्चर आणि फूड प्रोसेसिंग, अॅनिमेशनआयटीइलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकलट्रेडिंगइन्फ्रास्ट्रक्चरसेवा उद्योग स्वयंसेवी संस्था तसेच शैक्षणिक संस्थांची प्रदर्शनात विभागवार रचना करण्यात आलेली आहेअनेक मोठ्या उद्योगांबरोबरच मध्यम आणि नवोदित उद्योजकही सहभागी झाले आहेत.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा