महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
सशस्त्र बल ध्वजनिधी संकलन मोहिमेचा शुभारंभ गुरुवार, ०७ डिसेंबर, २०१७
बातमी
मुंबई : सशस्त्र बल ध्वजनिधी संकलन मोहिमेचा शुभारंभ राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे आज करण्यात आला.

यावेळी कामगार आणि माजी सैनिकांचे कल्याणमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, आमदार मंगलप्रभात लोढा, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी दिपेंद्र कुशवाह, व्हाईस ॲडमिरल गिरीश लुथ्रा, लेफ्टनंट जनरल विश्वंभर सिंग, एअर मार्शल मायकल फर्नांडिस, संचालक कर्नल सुहास जलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सैनिक कल्याण विभागाच्या वतीने ध्वजदिनानिमित्त ‘सैनिक मित्र’ या विशेषांकाचे प्रकाशन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गेल्या वर्षात उत्कृष्ट निधीसंकलन करणाऱ्या संस्था, स्वयंसेवी संस्था, विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा