महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
अपूर्ण पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती द्यावी - मुख्यमंत्री बुधवार, ११ एप्रिल, २०१८
बातमी
मुंबई : अपूर्ण पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती देण्यात यावी. कार्यारंभ झालेल्या कामांचे संनियंत्रण स्वतंत्र कक्षामार्फत करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेचा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी उपस्थित होते.

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून सध्या राज्यात 339 योजनांची कामे सुरू झाली आहेत. मंजूर योजनांच्या कामांची सद्यस्थिती पाहता प्रलंबित योजना पूर्ण करून ग्रामीण भागात पाणीपुरवठा सुरु करण्यात यावा. यासाठी जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले.

प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांमध्ये 83 योजनांचे पुन:र्जीवन करण्यात येणार असून त्यापैकी 2472.53 लक्ष रूपयांच्या 18 कामांचा कार्यारंभ आदेश देण्यात आले असल्याची माहिती अप्पर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांनी दिली. मागील तीन वर्षात तीन हजार 815 पाणीपुरवठा योजनांचे काम पूर्ण होऊन पाणीपुरवठा सुरू झाल्याची माहिती यावेळी पाणीपुरवठा मंत्र्यानी यावेळी दिली.

व्हीडिओ कॉन्फरसिंगद्वारे या योजनांच्या कामाचा जिल्हानिहाय आढावा यावेळी मुख्यमंत्र्यांनी घेतला. पेयजल योजना राबवताना आता 5 कोटी पर्यंतच्या कामांचे प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेचे अधिकार आता मुख्य कार्यकारी अधिकारीस्तरावर देण्याचा निर्णय घेऊन योजना पुर्णत्वास नेण्याच्या कामाला गती येईल, असे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकरांनी सांगितले. यावेळी आयआयटी मुंबई येथील प्राध्यापक प्रा. मिलिंद सोहोनी यांनी राज्यातील पाणीपुरवठा योजनांच्या विस्तृत अभ्यासाचे सादरीकरण केले. त्यांनी या अभ्यासावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा