महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी मुख्यमंत्र्यांचे विधानभवनात अभिवादन सोमवार, २५ नोव्हेंबर, २०१९
बातमी

मुंबई : राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्या जवळील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रतापराव-पाटील चिखलीकर, विधानसभा सदस्य सर्वश्री दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, विधानमंडळाचे सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत, उपसचिव विलास आठवले, उपसचिव राजेंद्र तारवी, सभापतींचे सचिव महेंद्र काज, अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर आदिंनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा