महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
गिरीश कर्नाड अष्टपैलू रंगकर्मी, विचारवंत : राज्यपाल सोमवार, १० जून, २०१९
बातमी
मुंबई : राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी गिरीश कर्नाड यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

प्रतिभावंत नाटककार, अभिनेते, लेखक, दिग्दर्शक व विचारवंत असलेले गिरीश कर्नाड हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांनी निवडलेल्या सर्वच क्षेत्रांमद्धे आपला वेगळा असा ठसा उमटवला. त्यांनी निर्मित केलेल्या नाट्यकृती त्यांच्या उच्च प्रतिभेची साक्ष देतात. समाजाच्या विविध प्रश्नांवर त्यांनी आपली मते परखडपणे मांडली. त्यांच्या निधनामुळे देशभरातील नाट्य चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे, या शब्दात राज्यपालांनी कर्नाड यांना आपली श्रद्धांजली वाहिली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा