महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
नागरिकांशी संवाद साधून परिणामकारकपणे दुष्काळी उपाययोजना राबवाव्यात - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना मंगळवार, १४ मे, २०१९
बातमी
टँकरद्वारे नियमित व पुरेसा पाणीपुरवठा करण्याच्या
मुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ ब्रिजद्वारे प्रशासनास सूचना

मुंबई :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नांदेड, हिंगोली, वर्धा, नागपूर व वाशिम जिल्ह्यातील सरपंचांशी ऑडिओ ब्रिज यंत्रणेद्वारे संवाद साधून दुष्काळी उपाययोजना करताना प्रशासनाने नागरिकांशी अधिकाधिक संवाद ठेवावा. प्रशासनाने लोकांमध्ये राहून उपाययोजना केल्यास त्या अधिक परिणामकारकतेने राबविता येतील, त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या.

गेल्या सहा दिवसांपासून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी हे राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह जिल्हास्तरावरील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संवाद साधत आहेत. आज नांदेड, हिंगोली, वर्धा,नागपूर व वाशिम या पाच जिल्ह्यातील साधारण शंभरहून अधिक सरपंचांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, तक्रारींची दखल घेऊन त्याचे तात्काळ निवारण करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनास मुख्यमंत्र्यांनी दिल्या. तसेच या जिल्ह्यांतील सरपंचांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी एक व्हॉट्सॲप क्रमांकही देण्यात आला आहे. या क्रमांकावर दुष्काळाशी संबंधित आलेल्या तक्रारींवरही तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
 
 
नागपूर जिल्ह्यातील सरपंचांनी नदी-नालेविहिरींमधील गाळ काढण्याची मागणी केली. त्यावर संबंधित गावांचा समावेश गाळमुक्त धरणगाळयुक्त शिवार योजनेत करून नदी/नाला खोलीकरणविहिरी व तलावातील गाळ काढण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच नांदेड जिल्ह्यात ज्या ठिकाणी टँकर सुरू आहेततेथील मागणीनुसार नियमित व योग्य प्रमाणात पाणी पुरविण्यात यावे. नागरिकांकडून कोणत्याही तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.
 
हिंगोली जिल्ह्यातील विशेष दुरुस्ती अंतर्गत जुन्या झालेल्या नळ पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करून पाणी पुरवठा सुरळीत करावा. राष्ट्रीय पेयजल व मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश झालेल्या गावांमधील कामासाठी निधीची कमतरता नसून ही कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
 
वर्धा जिल्ह्यात आवश्यकता असेल तेथे विंधण विहिरींचे अधिग्रहण करून सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावाअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच जुन्या पाणी पुरवठा योजनांना पाईपलाईन करणेविशेष दुरुस्तीमधील कामे पूर्ण करणे आदी सूचनाही त्यांनी दिल्या.
 
ग्रामस्थांच्या मागणीनुसार पिण्याच्या पाण्याचे टँकर्स व रोहयो कामांचे नियोजन करुन प्रशासनाने नागरिकांना दिलासा द्यावाअशा सूचना ‍मुख्यमंत्र्यांनी वाशिम जिल्हा प्रशासनाला दिल्या. यावेळी वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील सरपंचांनी गावातील टँकरपाण्याच्या टाक्याचारा छावण्याप्रलंबित पाणी पुरवठा योजनांची दुरुस्तीरोहयोची कामे अशा विविध मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत परिस्थितीची माहिती दिली. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीतहसिलदारगटविकास अधिकारी यांना तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
 
जेथे गरज असेल तिथे रोजगार हमीची कामे मिळतील याकडे जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष द्यावेअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 2018 ची लोकसंख्या विचारात घेऊन त्याप्रमाणे टँकरचा पाणीपुरवठा वाढविण्यात यावा. टंचाई संदर्भात तातडीच्या बाबींवर 48 तासांच्या आत निर्णय घेऊन कार्यवाही करण्यात यावी. तसेच आजच्या संवादात सरपंचांनी मांडलेल्या मुद्द्यांवर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा