महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानासाठी 9 कोटी 21 लाख रुपयांचे धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द सोमवार, ०७ ऑगस्ट, २०१७
बातमी
मुंबई : ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांर्तगत गावांचा सर्वांगीण विकासासाठी सी.एस.आर फंडाच्या माध्यमातून एकूण 9 कोटी 21 लाख रुपयांचे धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोमवारी सह्याद्रीगृह येथे विविध कंपन्यांच्या प्रमुखांनी सुपुर्द केले.

हिंदुस्थान युनीलिव्हर या कंपनीकडून रुपये 8 कोटीचा धनादेश तसेच स्वदेश फाऊंडेशनच्या वतीने एक कोटी तर सिस्का एलईडी कंपनीकडून रुपये 21 लाखाचा धनादेश असे एकूण 9 कोटी 21 लाख रुपयांचे धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द करण्यात आले.

सिस्का एलईडी कंपनीच्या वतीने प्रत्येक महिन्याला पाच गावात मोफत एलईडी लाईट्स बसविण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यावेळी ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे प्रमुख व मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रम्हण्यम, कार्यक्रम व्यवस्थापक सागर शिर्के, युवराज सासवडे, हिंदुस्थान युनिलिव्हरचे व्यवस्थापकीय संचालक संजीव मेहता, सीएसआरचे प्रमुख प्रसाद प्रधान, स्वदेश फाऊंडेशनचे रॉनी व झरिना स्क्रुवाला, सिस्का एलईडी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश उत्तम चंदानी, गोविंद उत्तम चंदानी आदि उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा