महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
ऑरिऑनप्रो सोल्युशन्सच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट बुधवार, १३ सप्टेंबर, २०१७
मुंबई : ऑरिऑनप्रो सोल्युशन्सच्या (Aurionpro solutions) शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज वर्षा निवासस्थानी भेट घेऊन विविध प्रकल्पांसाठी उपयुक्त असलेल्या नाविन्यपूर्ण थ्री-डी सोल्युशन्सचे सादरीकरण केले.

यावेळी डसॉल्ट सिस्टीम्स ग्रुपचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बर्नार्ड चार्ल्स आणि उपाध्यक्ष ग्लोबल (इनोव्हेटीव्ह बिझनेस) अलेक्झांडर पॅरील्युसन यांनी सादरीकरण केले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी उपस्थित होते.

यावेळी स्मार्ट सिटी अंतर्गत थ्री-डी डिझाइन, थ्री-डी डिजिटल एक्सपेरिअन्स, स्मार्ट प्रॉडक्ट्स, स्मार्ट दळणवळण प्रकल्प, वाहतूक व्यवस्था सोल्युशन्स, स्मार्ट सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, तसेच स्मार्ट पायाभूत प्रकल्प आदींविषयी सादरीकरण करण्यात आले. सिंगापूरमध्ये राबविलेल्या विविध डिजिटल सोल्युशन प्रकल्पाची माहिती याप्रसंगी देण्यात आली. छत्तीसगड सरकार सोबत करण्यात येत असलेल्या प्रकल्पांबाबतही सादरीकरणाचा यावेळी समावेश होता.

शिष्टमंडळामध्ये डसॉल्ट सिस्टीम्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष (इंडस्ट्री सोल्युशन्स) ऑलीव्हियर रिबेट, ऑरिऑनप्रो सोल्युशन्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक परेश झवेरी, डसॉल्ट सिस्टीम्सचे टेक्निकल असीस्टन्ट आणि सीईओ एलिसा प्रीसनर, व्यवस्थापकीय संचालक (इंडिया आणि एशिया पॅसिफीक साऊथ) सॅम्सन खआऊ, डसॉल्ट सिस्टीम्स इंडियाचे बिझनेस हेड रेड्डी कोथापल्ले, टेक्निकल डायरेक्टर प्रवीण मैसूर, अकाऊंट मॅनेजर (गव्हर्नमेंट बिझनेस) अमीत यादव, सेल्स मॅनेजर (ब्रॅण्ड) अरविंद श्रीनिवासन, ऑरिऑनप्रो सोल्युशन्सचे संजय बाली, उपाध्यक्ष (टेक्नॉलॉजी) योगेश सोनगडकर, डायरेक्टर (सेल्स) शोभीत वर्मा यांचा समावेश होता.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा