महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात उद्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांची मुलाखत गुरुवार, ०८ नोव्हेंबर, २०१८


मुंबई :
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांची 'करा कायदेशीर व्यवहार करा भ्रष्टाचार दूर ठेवा' या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दिनांक ९ नोव्हेंबर २०१८ रोजी संध्याकाळी ७.३० ते ८.०० या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदक सुरेश ठमके यांनी घेतली आहे.

लाचलुचपत विभागाची कार्यपद्धती,भ्रष्टाचारावर आळा घालण्यािकरिता विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना, भ्रष्टाचाराच गुन्ह्याची शिक्षा,भ्रष्टाचाराचे दूरगामी दुष्परिणाम तसेच भ्रष्टाचाराची तक्रार करण्याकरिता संपर्क क्रमांकाची माहिती श्री. बर्वे यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून दिली आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा