महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुलाखत बुधवार, १८ सप्टेंबर, २०१९

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलास कार्यक्रमात वित्त, नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची 'विकासाला आर्थिक बळ' या विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीचा दुसरा भाग राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून गुरुवार दि. १९ आणि शुक्रवार दि. २० सप्टेंबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

वित्तमंत्री म्हणून घेतलेले निर्णय, विदर्भ-मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी शासनाने घोषित केलेल्या विशेष पॅकेजची अंमलबजावणी, जीएसटीची अंमलबजावणी, विशेष सहाय्य योजनांसाठी वाढवलेले अनुदान, वृक्षलागवडीतून रोजगार निर्मिती आणि उत्पन्नवृद्धी यासाठी राबविलेले नावीन्यपूर्ण उपक्रम आदी  विषयाची  माहिती श्री.मुनगंटीवार यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा