महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
‘दिलखुलास’ कार्यक्रमामध्ये उद्या वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार गुरुवार, ०८ नोव्हेंबर, २०१८


मुंबई :
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात ‘महात्मा गांधीजींचे विचार आणि कार्य’ या विषयावर राज्याचे वित्त आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन शुक्रवार दिनांक ९ आणि शनिवार दिनांक १० नोव्हेंबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक हेमंत बर्वे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

शासन महात्मा गांधी यांची १५० वी जयंती दोन वर्ष साजरी करणार आहे. यासाठी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीची करण्यात आलेली स्थापना, महात्मा गांधीजींची शिकवण आणि त्यांची वैचारिक मुल्ये पुढे नेण्यासाठीचे नियोजन, सेवाग्राम आश्रमाचा विकास आराखडा, गावांचे आर्थिक सक्षमीकरणासाठी रोजगार निर्मिती करण्याबाबतची माहिती श्री. मुनगंटीवार यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा