महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विधानभवनात आदरांजली बुधवार, ०६ डिसेंबर, २०१७
मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज विधानभवन प्रांगणात असलेल्या त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, विधानपरिषद सदस्य नीलम गोऱ्हे, सचिव महेंद्र काज, सचिव राजकुमार सागर, उपसचिव राजेश मडावी आदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा