महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
मुंबईतील नद्यांचे प्रदूषण कमी करण्याबाबतचा बृहत आराखडा तयार करा- मुख्यमंत्री शनिवार, १५ जुलै, २०१७
मुंबई : मुंबईतील नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी दहिसर, मिठी, पोईसर, ओशिवरा या चार नद्यांच्या बाबतीत बृहत आराखडा सहा महिन्यात तयार करावा. त्यासाठी लोकांकडून सूचना व हरकती मागवाव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.



मुंबईतील चार नद्यांच्या विविध समस्यांबाबत रिव्हर मार्च व अन्य सामाजिक सस्थांच्या प्रतिनिधींची बैठक आज वर्षा निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री योगेश सागर, अतुल भातखळकर, प्रवीण दरेकर, आमदार मनीषा चौधरी, अमृता फडणवीस, मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य सचिव डॉ.पी.एन.अनबलगन उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, मिठी नदीप्रमाणेच उर्वरीत तिन्ही नद्यांच्या बाबतीत संयुक्त प्राधिकरण स्थापन करणार असून मलप्रवाह उपचार संयंत्रासाठी (एसटीपी) आयआयटी मुंबई तसेच नीरीच्या तंत्रज्ञानाचा उपयोग महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नद्यांमधील संरक्षण भिंतीसाठी काँक्रिटीकरण करण्याऐवजी गॅबीयन टाईपचे स्ट्रक्चर उभे करुन काँक्रिटला पर्याय उपलब्ध करुन द्यावा.

डेब्रीजच्या बाबतीत मुंबई महानगरपालिकेने रिसायकलींग प्लान्ट तयार करावा, असे निर्देशही श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा