महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
आदिवासी क्षेत्रातील मासेमारीसाठी पारंपरिक मच्छिमारांना प्राधान्यासाठी राज्यपालांकडे शिफारस - मुख्यमंत्री फडणवीस बुधवार, १३ सप्टेंबर, २०१७
मुंबई : पेसा कायद्यानुसार आदिवासी क्षेत्रात मासेमारी लिलाव देताना पारंपरिक मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना प्राधान्य द्यावे अशी शिफारस राज्यपालांकडे करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी आज झालेल्या बैठकीत दिली.

बैठकीमध्ये मत्स्य व्यवसाय विभागातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर, जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर,खासदार नाना पटोले, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, पदुम सचिव विकास देशमुख, महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अरुण शिंदे, मच्छिमार प्रतिनिधी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा