महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
निवडणूक विषयक कायदे आणि प्रक्रिया या पुस्तकाचे मुख्य सचिवांच्या हस्ते प्रकाशन गुरुवार, २५ सप्टेंबर, २०१४
मुंबई : ‘निवडणूक विषयक कायदे आणि प्रक्रिया’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते मंत्रालयातील त्यांच्या दालनात करण्यात आले.

या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव नितीन गद्रे, सह मुख्य निवडणूक अधिकारी निलेश गटणे, उपसचिव सुरज मांढरे, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर आदी उपस्थित होते.

कोकण विभागाचे अपर आयुक्त दिलीप शिंदे या पुस्तकाचे लेखक असून ‘निवडणूक विषयक कायदे आणि प्रक्रिया’ याबाबत सहज आणि सोप्या भाषेत या पुस्तकात माहिती देण्यात आली आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा