महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन गुरुवार, ११ एप्रिल, २०१९


मुंबई : महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विधानभवन येथील महात्मा जोतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले. त्यांच्या प्रतिमेस विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (कार्यभार) जितेंद्र भोळे व विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे खासगी सचिव राजकुमार सागर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव रवींद्र जगदाळे, सोमनाथ सानप, वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने, विधिमंडळ सचिवालयाचे कक्ष अधिकारी सुरेश मोगल, विनोद राठोड सुरक्षा अधिकारी किशोर गायके तसेच विधिमंडळ सचिवालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा