महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुलाखत गुरुवार, १० जानेवारी, २०१९मुंबई :
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात 'सुरळीत विजेसाठी सूत्रबद्ध नियोजन' या विषयावर ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क चंद्रशेखर बावनकुळे यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि. 11 जानेवारी 2019 रोजी संध्याकाळी 7.30 ते 8 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

राज्यातील विजेचा पुरवठा व मागणी, शेतकऱ्यांना १२ तास वीज पुरवठा व्हावा यासाठी सुरू असलेले ऊर्जा विभागाचे प्रयत्न, मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना, र्जा संवर्धन धोरण, जागतिक वारसा मान्यताप्राप्त घारापुरी (एलिफंटा) बेटाच्या विद्युतीकरणाचे कार्य, मोबाईल ॲपमुळे कामकाजात आलेली गतिमानता, एक ग्रामपंचायत एक वीजसेवक यासह ऊर्जा विभागाचे कामकाज यासंदर्भात सविस्तर माहिती श्री.बावनकुळे यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात दिली आहे.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा