महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
‘दिलखुलास’मध्ये उद्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गीते यांची मुलाखत गुरुवार, ११ ऑक्टोंबर, २०१८
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलास कार्यक्रमात ‘प्रधानमंत्री आवास योजनेची नाशिक जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी’ या विषयावर नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गीते यांची मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शुक्रवार दि. १२ आणि शनिवार दि. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका श्रीमती उत्तरा मोने यांनी ही मुलाखत घेतली आहे.

नाशिक जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेची उत्कृष्ट अंमलबजावणी, ग्रामीण भागात घर बांधण्याचे उद्दिष्ट, योजनेच्या प्रचारासाठी प्रसार माध्यमांचे उपयोग, स्वच्छ जिल्हा सर्वेक्षणात नाशिक जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी, जिल्ह्यात एकात्मिक बाल विकास योजनेची अंमलबजावणी, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवीन सोई-सुविधा, ‘पोषण आहार’ व ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान तसेच नाशिक जिल्ह्याच्या पुढील विकासाबाबतची माहिती श्री.गीते यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा