महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
अरबी समुद्रात ‘वायू’ चक्रीवादळ; समुद्रात न जाण्याचे मासेमारांना आवाहन मंगळवार, ११ जून, २०१९
 

मुंबई भारताच्या पूर्व मध्य व दक्षिण पूर्व अरबी समुद्रात ‘वायू’ चक्रीवादळ तयार झाले आहे. या वादळामुळे उद्या दि. 12 व दि. 13 जून रोजी महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर वाऱ्याचा वेग वाढणार आहे. कोकण व गोव्यातील काही भागात वादळासह मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नयेअसे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
 
भारताच्या पश्चिम-किनारपट्टीजवळ असलेल्या अरबी समुद्रात ‘वायू’ हे चक्रीवादळ तयार झाले आहे. मुंबईपासून दक्षिणनैऋत्य दिशेने 630 किमी अंतरावर हे चक्रीवादळ स्थित असून येत्या 24 तासात ते आणखी तीव्र होणार आहे. हे वादळ गुजरात किनारपट्टीच्या दिशेने जाणार असल्यामुळे राज्यात हे वादळ धडकण्याची शक्यता नाहीपरंतु त्याच्या प्रभावामुळे येत्या दोन दिवसात वाऱ्याचा वेग वाढणार आहे. तसेच किनारपट्टीच्या भागात व्यापक परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्या दि. 12 जून रोजी किनारपट्टीच्या जवळ समुद्र खवळलेला असेल. दि. 13 जून रोजी कोकण किनारपट्टीच्या उत्तर भागात समुद्र मोठ्या प्रमाणात खवळलेला असेल. त्यामुळे मासेमारांनी उद्या दि. 12 व गुरूवार दि.13 जून रोजी अरबी समुद्रात जाऊ नयेअसे आवाहन करण्यात आले आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा