महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या ‘गावांचा सर्वांगीण विकास’ या विषयावर मुलाखत शुक्रवार, ११ जानेवारी, २०१९मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात गावांचा सर्वांगीण विकास या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे (व्हीएसटीएफ) व्यवस्थापकीय संचालक रत्नाकर गायकवाड, कार्यकारी संचालक उमाकांत दांगट, अभियानाच्या कार्यकारी संचालिका श्वेता शालिनी, अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम यांचा सहभाग असलेली ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून सोमवार दि. 14 आणि मंगळवार दि. 15 जानेवारी रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका मनाली दीक्षित यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान नेमकं काय, या अभियानाची उद्दिष्ट्ये, मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक ही संकल्पना, अभियानाची आतापर्यंतची प्रगती, ग्राम सामाजिक परिवर्तनासाठीचे प्रयत्न, अभियानामध्ये कॅार्पोरेट पार्टनर्सचे असलेले योगदान, महिला सक्षमीकरण आदी विषयांची माहिती कार्यक्रमात सहभागी मान्यवरांनी दिलखुलासमधून दिली आहे.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा