महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात उद्या राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांची मुलाखत सोमवार, १२ मार्च, २०१८
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. 'राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची वाटचाल' या विषयावरील ही मुलाखत मंगळवार दि. १३ मार्च रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून संध्याकाळी ७.३० ते ८ या वेळेत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची रचना व कार्यपद्धती, बालकांचा व्यक्तिमत्व विकास, शिक्षणाचा, सामाजिक सुरक्षेचा अधिकार, पॉस्को कायदा, प्रत्येक बालकाला जन्मजात जीवन जगण्याचा, कोणत्याही प्रकारच्या आजारावर सर्वोत्तम दर्जाचा उपचार मिळण्याचा अधिकार, बालकांना जलद गतीने न्याय मिळण्यासाठी त्यांच्या हक्काची माहिती लोकांपर्यंत पोहचण्याकरिता चिराग नावाचे ॲप आयोगाने विकसित केले आहे. याबद्दल सविस्तर माहिती श्री.घुगे यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा