महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
दिलखुलास कार्यक्रमात : श्राव्य लोकराज्य एकच लक्ष्य 13 कोटी वृक्ष शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१८
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जुलै महिन्यात प्रसिद्ध झालेल्या ‘एकच लक्ष्य 13 कोटी वृक्ष’ या लोकराज्य अंकातील लेख ‘श्राव्य लोकराज्य’ या स्वरूपात दिलखुलास कार्यक्रमात प्रसारित होणार आहेत. आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून उद्या शनिवार दि. 11 आणि सोमवार दि. 13 ऑगस्ट रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत श्राव्य स्वरूपातील लेखांचे प्रसारण होणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन राजेश राऊत यांनी केले आहे.

लोकराज्य अंकातील 'नवे उपक्रम नवी दिशा', 'मिशन 13 कोटी वृक्ष ' व 'वन विकास व्याघ्र संवर्धन’ या लेखांतून वृक्षलागवडी संदर्भात वनविभागाच्या नाविन्यपूर्ण योजना व उपक्रम, समाजातील सर्व घटकांचा वृक्षलागवड मोहिमेत सहभाग तसेच वाघांच्या संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा