महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
वडाळा : विठ्ठल रखुमाईची तावडे यांच्या हस्ते पूजा शुक्रवार, १२ जुलै, २०१९

मुंबई : आषाढी एकादशी दिवशी प्रति पंढरपूर अशी ओळख असणाऱ्या वडाळा येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सपत्नीक विठ्ठल रखुमाईच्या मुर्तीची आज पहाटे विधिवत महाअभिषेक व पूजा केली. महाराष्ट्राच्या कोट्यवधी जनतेला सुखी ठेव आणि निरोगी ठेव अशी प्रार्थना आज विठ्ठलाच्या चरणी श्री.तावडे यांनी केली. राज्यात पाऊस पडू दे, पीक येऊ दे, राज्यातील जनतेला सुखी राहू दे हे हीच प्रार्थना विठ्ठलाच्या चरणी केल्याचे श्री.तावडे यांनी सांगितले. 

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा