महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
डॉक्टर व पोलिसांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत; लष्कराच्या मदतीची वेळ येऊ न देणे ही सर्वांची जबाबदारी - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन गुरुवार, २६ मार्च, २०२०

 


जीवनावश्यक वस्तू घरपोच-सोसायटीपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन व्हावे

मुंबई : कोरोना विषाणू प्रतिबंधक कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसवैद्यकीय अधिकारीकर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना कदापिही सहन केल्या जाणार नाहीतअसे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कारवाई केली जाईलअसा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. पोलीस आणि नागरिक दोघांनीही स्वयंशिस्तसंयम पाळावाअसे आवाहनही त्यांनी केले आहे. लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी अमेरिकेत लष्कराची मदत घेण्यात आली आहे. आपल्या राज्यात ती वेळ येऊ न देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहेअसेही त्यांनी म्हटले आहे.

राज्यात 21 दिवसांचा लॉकडाऊन’, संचारबंदी असली तरी  दूधभाजीपालाफळेऔषधेअन्नधान्यकुकिंग गॅस आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरु आहे. तरीही बाजारात खरेदीसाठी होणारी नागरिकांची गर्दी चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू घरपोच किंवा सोसायटी परिसरात उपलब्ध करण्याबाबत स्थानिक स्वराज संस्थांनी नियोजन करावेअशा सूचनाही त्यांनी दिल्या. बारामतीवाई शहरात अशी व्यवस्था करण्यात आली आहेअशी माहितीही त्यांनी दिली. शहरात एकाकी राहत असलेले ज्येष्ठ नागरिकविद्यार्थीरस्त्यावर राहणारे गरीबबेघर यांच्या भोजनाची सोय करण्यासाठी समाजानेस्वयंसेवी संस्थांनी पुढे यावेअसे आवाहन त्यांनी केले आहे.

प्रवासबंदी असताना काही जणांनी दुधाच्या टँकरमध्ये बसून प्रवास केल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. ही बेपर्वाई चिंताजनक आहे. वसईत पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर दुचाकी घालून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. बीडमध्येही पोलिसांवर हल्ला करण्यात आला. मालेगावात लोकप्रतिनिधींकडूनच वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली. अशा घटनांमुळे कोरोनाविरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे. जनतेने कोरोनाचे गांभीर्य ओळखून वर्तन ठेवावेपोलिसांना सहकार्य करावेअसे आवाहनही  त्यांनी केले आहे.

मध्यप्रदेशमध्ये माजी मुख्यमंत्र्यांच्या शेवटच्या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या एका पत्रकार बांधवाला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तेथे माजी मुख्यमंत्री आणि उपस्थित पत्रकारांना संसर्ग झाला असण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या राज्यातील लोकप्रतिनिधी आणि पत्रकार बांधवांनी ऑनलाईन’ संवाद साधून सुरक्षितता राखावीअसे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
0000

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनातील मुद्दे..
  ·      डॉक्टर व पोलिसांवरील हल्ले दुर्दैवी. असे हल्ले सहन केले जाणार नाहीत.
  ·      कोरोना प्रतिबंधक कार्यात अडथळे आणणाऱ्या व डॉक्टरपोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन कारवाई करणार
  ·      पोलीस आणि नागरिक दोघांनीही स्वयंशिस्त व संयम पाळावा.
  ·      लोक बाजारातरस्त्यावर ज्या पद्धतीने गर्दी करत आहेत, सुरक्षित अंतर पाळत नाहीतयामुळे करोनाच्या प्रादुर्भावाचा धोका वाढत आहे. 
  ·      नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होणे कोरोना प्रादुर्भावासाठी चिंताजनक आहे.
  ·      कोरोना प्रतिबंधक अंमलबजावणीसाठीलष्कराची मदत घ्यायला लागू नये हे पाहणे आपली सर्वांची जबाबदारी.
  ·      प्रवासबंदी असताना दुधाच्या टँकरमधून प्रवास करण्यासारख्या घटना गंभीर
  ·      राज्यात संचारबंदी असली तरी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत
  ·      दूधभाजीपालाफळेऔषधेअन्नधान्यजीवनावश्यक वस्तू घरपोचसोसायटीपर्यंत उपलब्ध करण्याचे नियोजन व्हावे.
  ·      केंद्रीय वाहतूकमंत्री  नितीन गडकरी यांनी केलेल्या टोलमाफीच्या  घोषणेचे स्वागत.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा