महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
'दिलखुलास’ कार्यक्रमात हर्षल विभांडीक यांची मुलाखत गुरुवार, ०७ डिसेंबर, २०१७
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास’ कार्यक्रमात धुळे जिल्ह्यात 'डिजिटल शाळा' हा उपक्रम राबविणारे हर्षल विभांडीक यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून शुक्रवार दि. 8 डिसेंबर आणि शनिवार दि. 9 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत वर्षा फडके-आंधळे यांनी घेतली आहे.

मूळचे धुळे जिल्ह्यातील श्री.विभांडीक सध्या न्युयॉर्क येथे नोकरी करतात. आपल्या जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्रातही डिजिटल शाळा सुरु कराव्यात ही संकल्पना कशी सुचली, या उपक्रमाच्या वाढीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न, धुळे जिल्हा परिषदेच्या 1103 शाळा कशा डिजिटल झाल्या आहेत, यामध्ये स्वयंसेवी संस्थाचा आणि प्रेरणा सभांच्या माध्यमातून झालेले काम याबाबत सविस्तर माहिती श्री.विभांडीक यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा