महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
दिलखुलास कार्यक्रमात उद्या डॉ.दीपक म्हैसेकर यांची मुलाखत बुधवार, ११ जुलै, २०१८
पंढरपूर आषाढ वारीचे नियोजन

मुंबई :
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांची पंढरपूर वारीचे नियोजन या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून गुरूवार दि. 12 आणि शुक्रवार दि. 13 जुलै रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

पुणे जिल्हा प्रशासनाने पंढरपूर आषाढ वारीसाठी पालख्यांच्या मार्गावर उपलब्ध केलेल्या सुविधा, स्वच्छतेसाठी जागोजागी ठेवण्यात आलेले फिरते शौचालय, कायदा व सुव्यवस्थेचे नियंत्रण व आपत्कालीन यंत्रणा, पंढरपूर तिर्थक्षेत्रातील रस्ते, पालखीस्थळ, भक्त निवास आदींचा विकास आराखडा तसेच मोबाईल ॲप विषयाची माहिती श्री.म्हैसेकर हे दिलखुलास कार्यक्रमातून देणार आहेत.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा