महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
“जय महाराष्ट्र” कार्यक्रमात आज 'पंढरपूरची वारी : तयारी प्रशासनाची' गुरुवार, १२ जुलै, २०१८
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित “जय महाराष्ट्र” कार्यक्रमात "पंढरपूरची वारी: तयारी प्रशासनाची” या विषावर श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले व सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीच्या दुसऱ्या भागाचे प्रसारण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दिनांक 13 जुलै रोजी संध्याकाळी 7.30 ते 8.00 या वेळेत होणार आहे. निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

पंढरपूरच्या आषाढी वारी संदर्भात मंदिर समितीचे व प्रशासनाचे नियोजन, पालखी मार्ग, पालखी तळ, विसावा या ठिकाणी प्रशासनाने केलेली तयारी, मंदिर समितीने दर्शन रांग, दर्शन मंडप येथे वारकऱ्यांसाठी केलेल्या सुविधा, प्रसादाच्या लाडूबाबत केलेले नियोजन, वारकऱ्यांसाठी आरोग्याच्या सुविधा, गर्दी आणि वाहतुकीचे व्यवस्थापन, चंद्रभागा नदीतील पाणी उपलब्धता, मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट आणि नगर प्रदक्षिणा मार्गावरील स्वच्छता, पंढरपूर येथे विठ्ठल - रुक्मिणी दर्शनासाठी टोकण पद्धत या विषयांची सविस्तर माहिती अतुल भोसले व डॉ.राजेंद्र भोसले यांनी “जय महाराष्ट्र” कार्यक्रमातून दिली आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा