महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
स्वयंअर्थसहाय्यित नवीन शाळा सुरु करण्यासाठी 15 मार्चपर्यंत अर्ज करावेत शनिवार, ०२ मार्च, २०१३
मुंबई : स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापन व विनियमन) अधिनियम 2012 अन्वये नवीन शाळा स्थापन करणे व विद्यमान शाळांचा दर्जावाढ करण्यासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या संस्थांनी विहित प्रपत्रामध्ये अर्ज भरुन, त्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात. अर्जासोबत 5 हजार रुपये चलनाद्वारे विहित लेखाशीर्षामध्ये जिल्हा कोषागारात जमा करुन दि. 15 मार्च 2013 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत समक्ष जमा करावेत, असे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक, पुणे यांनी केले आहे.

प्राथमिक शाळा सुरु करणाऱ्या संस्थांनी त्यांचे अर्ज शिक्षणाधिकारी (प्राथमिक) तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरु करणाऱ्या संस्थांनी त्यांचे अर्ज शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्याकडे समक्ष जमा करावेत. पोस्टाद्वारे/ कुरियरने पाठविलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच, सदरचा अर्ज सादर करण्यासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही.

स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, 2012 शासनाच्या www.depmah.com, www.mahdoesecondary.com आणि www.msbshse.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा