महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन मंगळवार, १४ नोव्हेंबर, २०१७
मुंबई : भारताचे पहिले प्रधानमंत्री दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवनामध्ये विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

माजी आमदार मधू चव्हाण, विधानसभा अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर, विधान परिषद सभापतींचे सचिव मु.म.काज, सहसचिव अशोक मोहिते, अवर सचिव सोमनाथ सानप, उपसचिव मेघना तळेकर, विशेष कार्यकारी अधिकारी निलेश मदाने यांनीही पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेला गुलाबपुष्प वाहून अभिवादन केले. यावेळी विधान भवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा