महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
नागरी सेवा दिनानिमित्त उद्या दि. २१ एप्रिल रोजी पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार, २० एप्रिल, २०१७
मुंबई : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे नागरी सेवा दिन 2017 निमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार व पारितोषिक वितरण समारंभ उद्या शुक्रवार दि. 21 एप्रिल 2017 रोजी सायं.4.00 वा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथी गृह, मलबार हिल, मुंबई येथे होणार आहे.

या कार्यक्रमास उद्योग मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार, खासदार अरविंद सावंत, आमदार राज पुरोहित, मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुमित मल्लिक, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय आदि उपस्थित राहणार आहेत.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा