महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी चित्रपटाचे प्रसारण सोमवार, ०२ डिसेंबर, २०१९

मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त महाराष्ट्र शासनामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ.आंबेडकर यांच्या समाज जीवनावर प्रकाश टाकणारा 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर- द अनटोल्ड ट्रुथ' (Dr.Babasaheb Ambedkar -The Untold Truth) या चित्रपटाचे प्रसारण दूरदर्शन केंद्रातर्फे सह्याद्री वाहिनीवर करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे प्रसारण ६ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वाजता करण्यात येणार असल्याची माहिती दूरदर्शनचे सहायक संचालक संदीप सूद यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा