महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
‘दिलखुलास’ मध्ये मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी गुरुवार, १७ मे, २०१८
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास' कार्यक्रमात ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम’ या विषयावर मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत शुक्रवार दि. १८ व शनिवार दि.१९ मे रोजी आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. मुख्यमंत्री यांच्या विशेष कार्य अधिकारी प्रिया खान यांनी ही मुलाखत घेतली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची युवकांना प्रशासनात सामावून घेण्याची संकल्पना, या कार्यक्रमाचा उद्देश, मागील तीन वर्षापासून सुरू असलेला मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाचा अनुभव, मुख्यमंत्री फेलोशिप २०१७ च्या कार्यक्रमातील फेलोज यांचे अनुभव, मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०१८ साठी अर्ज करण्यासाठी युवकांना केलेले आवाहन याविषयी सविस्तर माहिती 'दिलखुलास' कार्यक्रमात अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांनी दिली आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा