महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने खडीगंमत महोत्सवाचे आयोजन गुरुवार, १४ मार्च, २०१९
मुंबई : पारंपरिक लोककलांचा प्रचार व प्रसार अधिकाधिक होऊन लोककलांचे जतन करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने खडीगंमत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव १४ मार्च पासून २० मार्चपर्यंत हार्दिक सभागृह, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने दरवर्षी विविध पारंपरिक लोककला महोत्सवासाचे आयोजन केले जाते. या खडीगंमत महोत्सवात विदर्भातील पारंपरिक खडीगंमत लोकनाट्याचे सादरीकरण केले जाणार आहे. या सात दिवसीय महोत्सवात दररोज एक शाहिरी पथक आपली कला सादर करणार आहेत.

या महोत्सवात नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील शाहीर यादवराव खानोलकर, भंडारा जिल्ह्यातील शाहीर उत्तम आशीर्वाद, नागपूरचे शाहीर राजकुमार गायकवाड, नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी येथील शाहीर बाळाभाऊ बावणे, नागपूर जिल्ह्यातील शाहीर निनाद बाशेड, नागपूर जिल्ह्यातील नानाभाऊ तायवाडे, चंद्रपूरमधील शाहीर सुरमाताई बारसागडे कलाकार मनोरंजनातून समाजप्रबोधन करणारे कार्यक्रम सादर करणार आहेत. सर्व लोककलावंत आणि रसिकांनी या महोत्सवात सहभागी होऊन या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा