महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशानुसार टी १ वाघीण मृत्यू प्रकरणी सखोल चौकशीसाठी समिती गठीत शुक्रवार, ०९ नोव्हेंबर, २०१८


मुंबई :
टी १ वाघीण मृत्यू प्रकरणी सखोल चौकशीसाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रधान मुख्य वनसंरक्षक एस.एच.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.

वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सदस्य डॉ. बिलाल हबीब, वन्यजीव संवर्धन ट्रस्टचे अध्यक्ष अनिष अंधेरीया हे समितीचे सदस्य असून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नितिन काकोडकर समितीचे समन्वयक म्हणून काम पाहतील. सदर समिती टी १ वाघीण मृत्यू प्रकरणात मार्गदर्शक तत्व तसेच स्थायी कार्यप्रणाली योग्य पद्धतीने अवलंबिली गेली किंवा नाही याबाबत वस्तुस्थिती दर्शक चौकशी करून शासनाला आपला अहवाल सादर करणार आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा