महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
‘दिलखुलास’मध्ये 'मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०१९’ या विषयावर मुलाखत मंगळवार, ११ जून, २०१९


मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात 'मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०१९’ या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष कार्य अधिकारी प्रिया खान यांची माहिती स्वरूपातील विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत बुधवार दि. १२ जून रोजी राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या फेलोशिपविषयी आपल्या भावना या कार्यक्रमादरम्यान व्यक्त केल्या आहेत.

'मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०१९’ हा कार्यक्रम नेमका काय आहे, ही फेलोशिप सुरू करण्यामागची उद्दिष्टे, या फेलोशिपचा लाभ घेण्यासाठीची पात्रता, फेलोशिपचे स्वरूप, निवड झालेल्या तरुणांना कशा पद्धतीचं प्रशिक्षण दिले जाते आदी विषयांची सविस्तर माहिती श्रीमती खान यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा