महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
'जय महाराष्ट्र' मध्ये उद्या वन विभागाचे सचिव विकास खारगे यांची मुलाखत गुरुवार, ११ ऑक्टोंबर, २०१८
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात "१३ कोटी वृक्ष लागवड अंमलबजावणी" या विषयावर वन विभागाचे सचिव विकास खारगे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीचा दुसरा भाग दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि. १२ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७.३० ते ८ या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक शैलेश पेठे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

वन पर्यटन, इको टुरिझमचे महत्त्व, हॅलो फॉरेस्ट, हरित सेना, बांबू विकास संशोधन, वनक्षेत्र वाढविण्यासाठी अंमलात आणलेल्या उपाययोजना, वृक्ष लागवडीसंदर्भातील पुणे जिल्ह्यातील यशोगाथा, वृक्ष लागवडीच्या यावर्षी राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमात लोकसहभाग आणि प्रशासनाच्या समन्वयाबाबतची माहिती श्री.खारगे यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून दिली आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा