महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
वाहतूक नियंत्रणासाठी ट्रॅफिक वॉर्डन नेमण्यासंदर्भातील प्रस्ताव पाठवावे - डॉ.रणजित पाटील शुक्रवार, ११ जानेवारी, २०१९


मुंबई : वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ट्रॅफिक वॉर्डन नेमण्यासंदर्भात तसेच त्यासाठी होमगार्डची मदत घेण्यासंदर्भातील प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश गृह (शहरे), नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज येथे दिले.

वाहतूक पोलिसांना मदत व्हावी, यासाठी ट्रॅफिक वॉर्डन नेमण्यासंदर्भात आज मंत्रालयात डॉ.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी दक्षिण मुंबईचे सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट, नाशिकचे सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक) अशोक नखाते, नगर विकास विभागाचे उपसचिव शं. त्र्य. जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यातील महानगरपालिकांच्या हद्दीत वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांना सहाय्य व्हावे, यासाठी ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती करण्याचा विचार सुरू आहे. ट्रॅफिक वॉर्डन म्हणून होमगार्डची मदत घेण्याचाही विचार सुरू आहे. यासंबंधींचा प्रस्ताव संबंधित विभागाने तातडीने पाठविण्याच्या सूचना डॉ.पाटील यांनी यावेळी दिल्या.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा