महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये देशात जालना जिल्हा प्रथम गुरुवार, २० एप्रिल, २०१७
  • कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले जिल्हाधिकारी व कृषि अधिकाऱ्यांचे अभिनंदन
  • नागरी सेवादिनी पंतप्रधानांच्या हस्ते उद्या दिल्ली येथे जालन्याचे जिल्हाधिकारी स्वीकारणार पुरस्कार

मुंबई : सन 2016-17 या वर्षात प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये उत्कृष्ट काम करुन जालना जिल्ह्याने संपूर्ण देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. उद्या शुक्रवार 21 एप्रिलरोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या नागरी सेवादिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे पारितोषिक स्वीकारणार आहेत. जालना जिल्ह्याने मिळविलेल्या या यशाबद्दल कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी जिल्हाधिकारी व जिल्ह्यातील कृषी यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.

जिल्ह्यात 2015-16 या वर्षी खरीपात एकूण रु. 25 कोटी विमा हप्ता भरुन पिक विमा घेतलेल्या जिल्ह्यातील जवळपास 95 टक्के शेतकऱ्‍यांना रु. 431 कोटी 64 लाख रुपये आणि रब्बी मध्ये एकूण 2 कोटी विमा हप्ता भरून पिक विमा घेतलेल्या शेतकऱ्‍यांना 44 कोटी 29 लाख रुपये कोटी इतकी नुकसान भरपाई मिळाली. सन 2016-17 मध्ये जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नातून खरीपात 4 लाख 69 हजार आणि रब्बी मध्ये 1 लाख 27 हजार शेतकऱ्‍यांनी 39 कोटी रुपयांचा विमाहप्ता भरुन पिकविमा योजनेत भाग घेतला.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्याने देशात अग्रेसर कामगिरी केली असल्याचे कृषिमंत्री यांनी यावेळी सांगितले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा