महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
वनश्री पुरस्काराचे मंगळवारी राज्यपालांच्या हस्ते वितरण सोमवार, २० मार्च, २०१७
मुंबई : जागतिक वन दिनाचे औचित्य साधून मंगळवार दि. २१ मार्च २०१७ रोजी 'छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार २०१५' चे वितरण राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

मंत्रालयातील तळमजल्यावर त्रिमूर्ती प्रांगणात सायंकाळी ४.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, वन राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, मुख्य सचिव सुमित मल्लिक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमात वन सेवेत उत्कृष्ट काम करणाऱ्या वन कर्मचारी आणि अधिकारी यांना २०१५-१६ या वर्षाकरिता पदक देऊन सन्मानित केले जाणार आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा