महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
'दिलखुलास' कार्यक्रमात उद्या पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांची मुलाखत सोमवार, १२ मार्च, २०१८
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलास कार्यक्रमात 'झिरो पेंडन्सी आणि डेली डिस्पोजल' या विषयावर पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत मंगळवार दि. १३ मार्च आणि बुधवार दि. १४ मार्च रोजी आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक रुपलक्ष्मी चौगुले-शिंदे आणि धर्मेंद्र पवार यांनी ही मुलाखत घेतली आहे.

झिरो पेंडन्सी आणि डेली डिस्पोजल अर्थात स्वच्छ व तत्पर कार्यालय या उपक्रमाची रचना व कार्यपद्धतीचा आढावा, पुणे विभागातील शासकीय कार्यालयांनी उपक्रमासाठी दिलेला प्रतिसाद, संगणकीय प्रणालीचा वापर, ऑनलाईन टपाल, ट्रॅकिंग सिस्टीम आदी विषयांची सविस्तर माहिती श्री.दळवी यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा