महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
‘दिलखुलास’ कार्यक्रमात पदुम मंत्री महादेव जानकर गुरुवार, १२ ऑक्टोंबर, २०१७
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या विविध योजना कोणत्या आहेत हे जाणून घेण्यासाठी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून उद्या, शुक्रवार  १३ आणि शनिवार १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदक संजय भुस्कुटे यांनी घेतली आहे.

राज्यात दुधाचे उत्पादन आणि दुधाळ पशूंच्या दुग्धोत्पादनात भरीव वाढ तसेच मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी पदुम विभागामार्फत अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये उत्कृष्ट दूध उत्पादन देणाऱ्या गोवंशीय, म्हैसवर्गीय पशुंचे संवर्धन करण्यासाठी गावपातळीवर अनेक योजनाही राबविण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर शासनाने मत्स्य उत्पादनाला चालना देण्यासाठी नीलक्रांती धोरण राबविले आहे. या धोरणाबाबत तसेच विभागाविषयी सविस्तर माहिती श्री. जानकर यांनी 'दिलखुलास'कार्यक्रमातून दिली आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा