महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
दिलखुलास कार्यक्रमात अन्न सुरक्षा विभागाच्या आयुक्त पल्लवी दराडे यांची उद्या मुलाखत मंगळवार, १२ जून, २०१८
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त अन्न सुरक्षा विभागाच्या आयुक्त पल्लवी दराडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून उद्या बुधवार दि. 13 आणि गुरुवार दि. 14 जून रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका उत्तरा मोने यांनी ही मुलाखत घेतली आहे.

नागरिकांना आरोग्यदायी आणि सुरक्षित अन्न मिळावे यासाठी अन्न सुरक्षा विभागाचे प्रयत्न, भेसळयुक्त खाद्यपदार्थांवर विभागाद्वारे वेळोवेळी करण्यात येणारी धडक कारवाई, फूड टेस्टींग लॅब, अन्न व औषध प्रशासनाचे नवीन संकेतस्थळ, स्वच्छता राखणाऱ्या 30 हॉटेल्सना देण्यात आलेले हायजीन रेटींग प्रमाणपत्र, मिठाई व दुधातील भेसळ रोखणे तसेच नागरिकांच्या तक्रारींचे निवारण आदी विषयांची माहिती श्रीमती दराडे यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा