महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
मराठी आणि हिंदी निम्नस्तर आणि उच्चस्तर परीक्षेसाठी अर्ज करण्याचे आवाहन शुक्रवार, १९ मे, २०१७
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असलेल्या अमराठी भाषिक अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा निम्नस्तर व उच्चस्तर परीक्षा दि. 16 जुलै 2017 रोजी मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद या चार विभागीय ठिकाणी घेण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी विहित नमुन्यातील आपली आवेदनपत्रे विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख यांच्यामार्फत संबंधित विभागीय कार्यालयांकडे दि. 15 जून 2017 पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.

याबरोबरच एतदर्थ मंडळामार्फत हिंदी भाषा निम्नश्रेणी व उच्चश्रेणी परीक्षा दि. 30 जुलै 2017 रोजी मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद या चार विभागीय ठिकाणी घेण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी विहित नमुन्यातील आपली आवेदनपत्रे विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख यांच्यामार्फत संबंधित विभागीय कार्यालयाकडे दि. 20 जून 2017 पर्यंत पोहोचणे आवश्यक आहेत.

अमराठी भाषिक राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी एतदर्थ मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी मराठी भाषा निम्नस्तर व उच्चस्तर परीक्षा दि. 06 ऑगस्ट 2017 रोजी पुणे केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी विहित नमुन्यातील आपली आवेदपत्रे विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख यांच्यामार्फत दि. 30 जून 2017 पर्यंत पोहोचणे आवश्यक आहेत.

मराठी आणि हिंदी भाषा निम्नस्तर व उच्चस्तर परीक्षेसाठी विभागीय कार्यालय तसेच भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य, प्रशासकीय इमारत, 5 वा मजला, डॉ.आंबेडकर उद्यानाजवळ, शासकीय इमारत, वांद्रे (पूर्व), मुंबई-400 051. दूरध्वनी क्र.022- 26552184 आणि 022- 26417265 येथे संपर्क करावा. मुंबई व कोकण विभागातील अर्ज विभागीय सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, कोकण भवन, 3 रा मजला, नवी मुंबई-400614, दूरध्वनी क्र.022-27573542 येथे पाठविता येतील. पुणे व नाशिक विभागात राहणाऱ्यांना या परीक्षेसाठीचे अर्ज विभागीय सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, नवीन मध्यवर्ती इमारत, 2 रा मजला, पुणे-411001, दूरध्वनी क्र. 020-26121709 येथे करता येईल. तर नागपूर व अमरावती विभागात राहणारे विभागीय सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, प्रशासकीय इमारत, 2 रा मजला, सिव्हिल लाईन्स, नागपूर-440001, दूरध्वनी क्र. 0712-2564956 येथे तर औरंगाबाद विभागासाठी विभागीय सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, जुने जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर, औरंगाबाद-431001, दूरध्वनी क्र. 0240-2361372 येथे अर्ज करता येतील.

परीक्षेसंदर्भात अधिक माहिती आवश्यक असल्यास उपरोक्त संबंधित विभागीय सहायक भाषा संचालक यांच्याशी किंवा भाषा संचालक यांच्याशी दूरध्वनी क्र. 022- 26552184 वर संपर्क साधावा, असे आवाहन भाषा संचालक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा