महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
'दिलखुलास' मध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट मंगळवार, १४ नोव्हेंबर, २०१७
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात पुणे जिल्ह्याचा विकास या विषयावर अन्न व नागरी पुरवठा तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची मुलाखत आकाशवाणीवरून बुधवार, दि. १५ आणि गुरुवार दि. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत हेमंत बर्वे यांनी घेतली आहे.

स्वच्छता अभियानात पुणे जिल्ह्याने घेतलेली आघाडी, जलयुक्त शिवार अभियान, मुद्रा योजनेचा लाभ, स्टार्ट अप–स्टँड अप, मेट्रो तसेच रिंग रोड रस्ते, आदी विषयांवरची माहिती श्री.बापट यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा