महान्यूज मंत्रालय
महान्यूज मंत्रालय
दादा वासवानी यांच्या निधनाने मानवतेचा सदिच्छादूत हरपला - मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली गुरुवार, १२ जुलै, २०१८
मुंबई : ज्येष्ठ आध्यात्मिक गुरू दादा वासवानी यांच्या निधनाने मानवतेचा पुरस्कार करणारा एक श्रेष्ठ सदिच्छादूत हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, दादा वासवानी यांच्याशी माझा निकटचा ऋणानुबंध होता. त्यांच्याशी अनेकदा झालेल्या चर्चेदरम्यान त्यांच्या विचारांनी प्रभावित झालो. विशेषतः मानवतावादावरील त्यांचे विचार दिशादर्शक आहेत. शिकागो येथील जागतिक धर्म संसद आणि न्यूयॉर्क येथील जागतिक शांतता परिषदेत त्यांनी केलेले संबोधन भारतीय तत्त्वज्ञानाची महत्ता दर्शविणारे होते. जनसेवा हीच ईश्वरसेवा या ब्रीदानुसार साधू वासवानी मिशनच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य मोलाचे असून अध्यात्मावरील त्यांची पुस्तके नव्या पिढीसाठी सदैव मार्गदर्शकाची भूमिका बजावतील. त्यांच्या निधनाने देशाने एक थोर सुपूत्र गमावला आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा